Community Service ( समाजऋण )

The Foundation recognizes its social duty and is bound to fulfill it. They engage in representative community service in a positive effort for society.

• Many people of Pani Foundation worked together for the ‘interest of agriculture, farmers’, all members and well-wishers, friends and families, which means that about 90 lakhs of water will be saved. 5 villages tanker free.
• Distribution of school materials to 150 students of Dhal-Talwar section from scratch.
• Blood donation camp every year during Ganeshotsav.
• Mahilapalak and HIV affected girls and Mahila Mahabhondala.
• 100 blind students from Kothrud and Blind Children’s School, Koregaon Park practiced and prepared their drums and cymbals.
• A team of 15 multi-disabled students at Intervida Jagruti Multi-Disabled Vidyalaya, Hadapsar.
• Distribution of 500 grains and cereals during Corona period.
• 150 saplings planted on both sides of 3 km road and at Pisurti, Purandar.
• Raksha Bandhan is celebrated at Kailas Crematorium, Shelter- Old Age Home, Yerwada Jail, Prosthetic Organ Donation Center and Army Hospital (Khadki), Police, Fire Brigade, Old Age Home.
• Financial assistance given to Devang Marine who was found in an elevator accident. (Reference Daily Morning).
• ‘Dhol Tasha Competition 2012’ Prize (1st Place) Rs 50,000 was donated to two blind schools in Pune.
• Till date a total of 1.25 Crore ( One Crore Twenty Five Lakh rupees) has been tried to pay off the social debt by donating for educational and social work.

समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा, ध्वज व ढाल-तलवार पथक, पुणे व श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने हिरामण बनकर विद्यालय येथे ढाल तलवार पथकातील १०० व बीड येथील पूरग्रस्त ६५ गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी श्री.महेश कराळे, श्री.विकास कड, श्री.सचिन जगताप व श्री.गिरीश कोंढरे इ.मान्यवरांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.हनुमंत बहिरट पाटील, सचिव श्री.सुधीर दुर्गे, श्री.किरण सोनवणे, समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.संजय सातपुते, खजिनदार श्री.निरंजन माळवदकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.शिर्के सर, श्री. सांडभोर सर व ढाल तलवार पथकातील विद्यार्थी उपस्थित होते.
जय समर्थ!

श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट व समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने राजमाता जिजाऊ अभ्यासिका,
मंगळवार पेठ येथे अभ्यासिकेतील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके ठेवण्यासाठी लोखंडी कपाट देण्यात आले.

मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर येथील दुर्गम गावांमध्ये गेली २५ वर्षे दोन दिवसीय शिबिराचे
आयोजन – शौचालय बांधणे, बंधारा बांधणे, रस्ता दुरुस्ती विविध सार्व. लाभाची कामे

पाणी फाउंडेशन सोबत ‘एक दिवस शेतीसाठी… शेतकऱ्यांच्या हितासाठी’ या उपक्रमाअंतर्गत सर्व सदस्य श्रमदान. ९० लाख लिटर पाण्याची बचत व ५ गावे

प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून ढाल – तलवार पथकातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप व शैक्षणिक खर्च केला जातो

दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान महारक्तदान शिबिराचे आयोजन २५ वर्षामध्ये २५०० हून अधिक रक्त पिशव्यांचे दान

महिला पालक आणि एच.आय.व्ही बाधित मुली आणि महिला महाभोंडला.

कोथरूड आणि कोरेगाव पार्क येथील अंध मुलांची व मुलींची शाळा येथील १०० अंध विद्यार्थ्यांचे ढोल ताशा व झांज पथक तयार करण्यात आले.

इंटरविडा जागृती बहु-विकलांग विद्यालय, हडपसर येथे १५ बहु-विकलांग विद्यार्थ्यांचे झांज पथक तयार करण्यात आले.

कोरोना कालावधीत ५०० शेतकरी व गरीब कुटुंबीयांना धान्य आणि तृणधान्यांचे वितरण

कैलास स्मशानभूमी, येरवडा कारागृह, कृत्रिम अवयव दान केंद्र आणि आर्मी हॉस्पिटल (खडकी), पोलीस, अग्निशमन दल, वृद्धाश्रम येथे प्रतिवर्षी सामाजिक रक्षाबंधन

‘ढोल ताशा स्पर्धा २०१२’ मध्ये मिळालेले प्रथम पारितोषिक पुण्यातील दोन अंध शाळांना रुपये ५०,००० दान करण्यात आले.

अनेक संस्थांमधील अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व समर्थ प्रतिष्ठानने घेतले आहे.

श्री वृद्धेश्वर सिध्देश्वर मंदिर देवस्थान जिर्णोद्धारामध्ये पथकाच्या मार्गदर्शिका व ढोल वादक आदरणीय शोभाताई धारीवाल यांच्या सहकार्यातून सुशोभित सभामंडप नुतनीकरण यामध्ये प्रतिष्ठानचा सक्रिय सहभाग

शैक्षणिक भेटी, सहल यांचे आयोजन केले जाते.

आठवणीतील छायाचित्र – हिवाळी सामाजिक शिबीर